जळगाव शहर

केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘व्हरचूएल प्रयोग शाळेचे’ उद्घाटन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयटी मुंबई व केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने ‘व्हरचूएल प्रयोग शाळेच्या’ नोडल सेन्टरचे संस्थेचे खजिनदार डी.टी. पाटील यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास प्राचार्य एस.ओ. दहाड, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय सुगंधी, अकॅडेमिक डीन डॉ.पी.ए. विखार, नोडल सेन्टरचे समन्वयक प्रा.मनोज नेहेते यांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. नोडल सेण्टरमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनासाठी आणि प्रयोगांसाठी आयआयटी मुंबई येथील आधुनिक प्रयोगशाळा व उपकरणे व्हरचूएल पद्धतीने उपलब्ध झाले आहेत. ह्या व्हरचूएल प्रयोग शाळांमुळे संशोधन करण्यास वेळेची बचत, ऑनलाईन सेट अप, मेंटेनन्सरहित सेवा, अत्याधुनिक पध्द्ती व तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांना मुंबई व पुणे येथे जाण्याची आता गरज भासणार नाही. ह्या केंद्रात यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक अभियांत्रिकी, केमिकल अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी आदी शाखांचे विध्यार्थी प्रयोग करू शकतील. जास्तीत जास्त संशोधक विद्यार्थ्यांनी नोडल केंद्राला भेट देऊन उपयोग घेण्याचे आवाहन प्राचार्य प्रा.एस.ओ. दहाड यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button