⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्री मंगळ ग्रह मंदिरात पार पडला श्री तुळशी विवाह महासोहळा

राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्री मंगळ ग्रह मंदिरात पार पडला श्री तुळशी विवाह महासोहळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amalner News । जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशी विवाहानंतर वधू-वरांच्या ब्रह्मगाठी विवाह सोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा कायमस्वरूपी टिकून राहावी, मंदिरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराची विशेष आराधना करावी, या उद्देशातून मंगळग्रह सेवा संस्थेने अत्यंत शुभदिन असलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुळशी विवाह महासोहळ्याची परंपरा सुरू केली आहे.

यंदाचे अकरावे वर्ष आहे. प्रारंभी वराच्या वेशातील भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची सजवलेल्या रथात व श्री मंगळदेव ग्रहाची उत्सवमूर्ती असलेल्या पालखीची मंदिर परिसरात मिरवणूक वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यात स्त्री-पुरुष भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्य करून आनंद व्यक्त केला. या महासोळ्याचे मुख्य यजमान पुण्यातील श्याम ग्लोबल इंडस्ट्रीजचे संचालक नरेंद्र गोयल सपत्नीक होते. औरंगाबाद येथील उद्योजक शैलेश कासलीवाल यांनी सपत्नीक पालखीचे पूजन केले.

महासोहळ्यामध्ये बसलेल्या पूजा मानकऱ्यांची नावे अशी : प्रशांत कोते- पाटील (शिर्डी), दीपक वाजे-पाटील (शिर्डी), सीए निखिल गंगवाल (औरंगाबाद), शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बाणकर, उपाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी दरंदले, उद्योजक पवन अग्रवाल (बीड), बांधकाम कंत्राटदार अनिल सोनवणे (शिर्डी), पोलीस निरीक्षक विजय पवार (मुंबई), ज्येष्ठ पत्रकार राजेश यावलकर (जळगाव), निवृत्त पोलिस उप अधीक्षक श्याम सोमवंशी (जळगाव) , अनेक शिक्षण संस्थांचे सर्वेसर्वा हरी प्रसन्ना चितापूरकर (गुलबर्गा), हे होते. तर विशेष पंचामृत प्रात: पूजेचे मानकरी श्री तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त तथा पवनहंस हेलिकॉप्टर कंपनीचे संचालक सौरभ बोरा (मुंबई), सनी वाघ (कोपरगाव), मौलिक टिळेकर (कोपरगाव), प्रकाश गाडे (कोपरगाव) व डॉ. महेंद्र ठाकरे (ठाणे) हे होते.

या शाही विवाह महासोहळ्यात वर – वधूच्या मामांची भूमिका माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निकुंभ सर यांनी निभावली. विवाह महासोहळ्यानंतर सुमारे पाच हजार भाविकांनी पारंपारिक अस्सल महाराष्ट्रीयन विशेष मेनूचा महाप्रसाद म्हणून आस्वाद घेतला. विशेष म्हणजे पुणे येथील ख्यातनाम वेंकीज कंपनीतर्फे सव्वा लाख रुपयांचे गावरान तुपातील चितळे बंधू (पुणे) यांचे कडील बालुशाहीचे सोमवार व मंगळवारी प्रसाद स्वरूप वाटप केले.

ज्येष्ठ पुरोहित केशव पुराणिक व मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना पुजारी तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी , मेहुल कुलकर्णी,सारंग पाठक निलेश असोदेकर अथर्व कुलकर्णी , व्यंकटेश कळवे यांनी सहकार्य केले. संजय सिंह चौहान (औरंगाबाद) यांनी मार्गदर्शन केले.

महासोहळा यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, डी. ए. सोनवणे, सेवेकरी सुनीता कुलकर्णी, उज्चला शहा, विनोद कदम, भरत पाटील, शरद कुलकर्णी, रवींद्र बोरसे, विनोद अग्रवाल, हरिओम अग्रवाल, पंकज मुंदडे, प्रशांत सिंघवी महेश कोठावदे, जितेंद्र गोहिल महावीर पहाडे, दिलीप गांधी, जितेंद्र पारख ,अमोल पाटील (मुंबई) जी. एस. चौधरी, उमाकांत हिरे, आर .जे. पाटील, राहुल पाटील,गोरख चौधरी, पुष्यंद ढाके, एम. जी. पाटील, आशिष चौधरी, सुबोध पाटील, निलेश महाजन, चंद्रकांत महाजन आदींनी परिश्रम घेतले. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.

पहा व्हिडीओ प्रक्षेपण : https://youtu.be/kw2cof7P2Ow

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.