⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

एकांकिका स्पर्धेत चोपडा येथील महात्मा गांधी संस्थेच्या महाविद्यालयाची “मॅडम” ही एकांकिका प्रथम

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत चोपडा येथील महात्मा गांधी संस्थेच्या महाविद्यालयाची “मॅडम” ही एकांकिका प्रथम आली.

स्पर्धचे उदघाटन जेष्ठ विधी तज्ञ ऍड.सुशील अत्रे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य तथा क.ब.चौ.उमवी चे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील कुलकर्णी, विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा.डॉ.विजय लोहार ,महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी उपप्राचार्य डॉ .एन जे पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.राहुल संदनशिव, परीक्षक पियुष रावळ, योगेश पाटील,अपूर्वा कुलकर्णी हे उपस्थित होते.

या वेळी महाविद्यालयाचा प्रगतीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली. नटराज पूजन,दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन घंटानाद करून झाले. ऍड सुशील अत्रे यांनी, ज्यात आपण प्रभाव पाडू शकतो यावर आपलं नाटक सादर करावे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन केले. डॉ.सुनील कुलकर्णी यांनी, नाटकातून समस्या जरूर मांडा परंतु त्यावर समाधान कस मांडता येईल हे देखील सांगायला विसरू नका असे मत मांडले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एल पी देशमुख यांनी अश्या प्रकारच्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो असे सांगितले. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा एकांकिका स्पर्धेनंतर झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ रंगकर्मी,साहित्यिक चिंतामण पाटील, उपप्राचार्य डॉ एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा.राजेंद्र देशमुख, विद्यापीठ प्रतिनिधी प्रा.डॉ.विजय लोहार, प्रा.डॉ राहुल संदनशिव,परीक्षक पियुष रावळ, योगेश पाटील,अपूर्वा कुलकर्णी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.राजेंद्र देशमुख तर आभार डॉ.अफाक शेख यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल

प्रथम सांघिक एकांकिका : चोपडा येथील महात्मा गांधी महाविद्यालय एकांकिका ‘मॅडम ‘, द्वितीय – भुसावळ येथील पी.ओ. नहाटा महाविद्यालयाची एकांकिका ‘मुंग्या’, तृतीय – मुळजी जेठा महाविद्यालयची एकांकिका- ‘प्रेमा’ जळगाव. उत्तेजनार्थ सांघिक पारितोषिक एन टी वि एस कॉलेज, नंदुरबारची एकांकिका “बेगर्स फॉर डॉक्टर” त्कृष्ट दिग्दर्शन – प्रथम – दिमाने पठार (मॅडम), द्वितीय – सोनल पगारे – (मुंग्या), उत्कृष्ट लेखन – प्रथम – रूपाली पाटील (मुंग्या), द्वितीय – प्रज्ञा बि-हाडे – (प्रेमा), उत्कृष्ट नेपथ्य – प्रथम – हर्षल निकम (मॅडम), द्वितीय – अभिषेक कासार (प्रेमा), उत्कृष्ट प्रकाश योजना – प्रथम – विशाल गाडीलोहार (मॅडम), द्वितीय – उमेश चव्हाण (प्रेमा), उत्कृष्ट पार्श्वसंगीत – प्रथम – स्वप्निल ननवरे (मुंग्या), द्वितीय – जयेश महाजन (मॅडम), उत्कृष्ट रंगभूषा – स्वप्नील डोळसे (मुंग्या) द्वितीय – रूपाली कोळी (डॉक्टर फोर बेगर), उत्कृष्ट अभिनय – पुरुष – प्रथम – दर्शन गुजराती (मुंग्या), द्वितीय कुणाल वीर (डॉक्टर फोर बेगगर), उत्कृष्ट अभिनय -महिला -प्रथम – गौरी चौधरी (मॅडम), द्वितीय – तेजसा सावळे (प्रेमा), अभिनय प्रमाणपत्र – सिद्धांत सोनवणे, प्रज्ञा बिऱ्हाडे (प्रेमा), उमेश गोरदे, सोनल पगारे (मुंग्या), रचना अहिरराव, हितेशा हडप (मॅडम).