जळगाव जिल्हाजळगाव शहरबातम्या

जिल्ह्यात १५५१ जि.प. शाळांमध्ये पूर्वतयारी मेळावा उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । राज्यात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित असलेल्या सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांमध्ये शाळेची मानसिकता तयार करण्यासाठी शाळा प्रवेशपूर्व मेळावा घेण्यात आला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरातील शाळांमधून हा मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी जळगाव येथील शासकीय अध्यापक विद्यालयाचे अधिव्याख्याता डी. बी. साळुंखे यांनी प्रत्येक तालुक्यातील समन्वयकांना माहिती दिली आहे. यासंदर्भात आज (दि.१९) जिल्ह्यातील १५५१ जि.प.शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.

राज्यामध्ये मागील तीन वर्षांत कोविडमुळे अंगणवाडीतील बालकांना पूर्वप्राथमिक आकार हा अभ्यासक्रम अंगणवाडीमधून घेता आला नाही. आता शाळापूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अंगणवाडीतील बालकांनादेखील आता इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून अंगणवाडीमध्ये न गेलेल्या बलकांकडे इयत्ता पहिलीसाठी असलेल्या किमान मूलभूत क्षमता नाहीत. त्यामुळे या बालकांना इयत्ता पहिलीसाठी कसे प्रवेशित करावे, असा प्रश्न आहे. त्यामुळे उन्हाळी सुटीच्या काळात प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्या मार्गदर्शनाखाली या बालकांना किमान मूलभूत क्षमतेची माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी ७० हजार शाळांमधून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग यांच्या वतीने शाळा प्रवेशपूर्व मेळावा घेतला जाणार आहे. शाळेबाबत वातावरण निर्मिती तसेच शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता तयार केली जाणार आहे. पुढील आठवड्यात राज्यभरात शाळांमधून हे पूर्वतयारी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.


शाळांची संख्या
अमळनेर- १३४, भडगाव- ३६, भुसावळ- ६६, बोदवड-२६, चाळीसगाव- १९०, चोपडा- १००, धरणगाव- ९१, एरंडोल- ७६, जळगाव- ८१, जामनेर- १९७, मुक्ताईनगर- ८४, पाचोरा- १२५, पारोळा- १०४, रावेर- १५०, यावल- ९१, एकूण- १५५१.

Related Articles

Back to top button