जळगाव जिल्हा

लोहारात जिल्हाधिकारी पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या ताफ्यासह लोहारा रोडवरील शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली

याच बरोबर परिसरात दोन दिवसात पडलेल्या पावसाची नों २१४ मी. मी. झालेली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाधित मालाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या मालाची शेतकऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सर्व शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा या अधिकाऱ्यांसमोर नुकसानीचे पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या कपाशी पिकाच्या काळ्या पडलेल्या कैऱ्या व बोंडे जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले.

यावेळी पाचोरा तहसिलदार कैलास चावडे, जि. प. सदस्य दिपकसिंग राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, मंडळ अधिकारी संजय साळुंखे, तलाठी बी. एम. परदेशी, तालुका कृषी अधिकारी अशोक जाधव,सरपंच कैलास भगत, सदस्य कौतिक पाटील व परिसरातील शेतकरी या वेळी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button