जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । दाम्पत्याचा विश्वास संपादन करून १ लाख रूपये घेवून परत न करता दाम्पत्याची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात अला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील चंद्रप्रभा कॉलनी येथे सुनील जगन्नाथ जोहरे वय ५५ हे पत्नी रंजना हिच्यासोबत वास्तव्यास आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुनीता जीवन ऊर्फ कैलास सपकाळे वय 30 रा पिंप्राळा हुडको जळगाव, जीवन ऊर्फ कैलास सपकाळे यांच्यासह चार जणांनी सुनील जोहरे व त्यांची पत्नी यांचा विश्वास संपादन केला. तसेच खोटे आमिष व आश्वासन देवून सुनील जोहरे यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. पैशांची मागणी केली असता, सुनीता सपकाळे व जीवन सपकाळे या दोघांनी सुनील जोहरे व त्यांची पत्नी रंजना या दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. ६ महिने उलटूनही पैसे परत मिळन नसल्याने फसवणुकीची खात्री झाल्यावर सुनील जोहरे यांनी याबाबत गुरुवारी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन सुनीता सपकाळे, जीवन सपकाळे वय ३७ रा. भुसावळ, दिपक पूर्ण नाव माहित नाही व सोनू पूर्ण नाव माहित नाही दोन्ही रा.भुसावळ या चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश भावसार हे करीत आहेत.