भविष्यात जळगावची ओळख मनोबल प्रकल्पाने होईल – डॉ.विजय माहेश्वरी
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचे वेड रक्तातच असावं लागत, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही तसेच प्रवाहाच्या दिशेनं कुणीही पोहू शकत पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला दुर्दम्य इच्छाशक्ती लागते आणि ते काम दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल करीत आहे, त्यामुळे भविष्यात जळगावची ओळख मनोबल प्रकल्पाने होईल असे प्रतिपादन बहिणाबाई चोधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी यांनी केले.
दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील दिव्यांग, अनाथ, वंचित घटकांतील विदयार्थ्यांसोबत दरवर्षी मनोबल येथे दिवाळी साजरी करण्यात येते.जे डोळ्याने प्रकाश बघू शकत नाही अश्या अंध विद्यार्थ्यांमधील ज्ञानरूपी प्रकाशाचे पूजन करण्यासाठी ‘प्रकाशपुजन’ या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.या वर्षीही ‘प्रकाशपुजन’ हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मनोबल प्रकल्पाच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी संपन्न झाला, या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमात दीपस्तंभ जळगाव व पुणे येथील दिव्यतेज टीम ने गायन व वादन सादरीकरण करीत सुरेल मैफल सजवली.मनोबलचे फैयाज अत्तार, श्याम मिश्रा, आशा वरांगडे ,दिव्यता अधिकारी, स्वामीनी , शेख नाझनीन, अनुषा महाजन, शिवा परमार यांनी विविध गाण्याचे सादरीकरण केले तर सुरज केणी, लक्ष्मी शिंदे, मानसी पाटील यांनी नृत्य सादर केले. चैतन्य पानवलकर याने बासरी वादन तर फैयाज अत्तार याने माऊथ ऑर्गन वर गीत सादर केले.एक पाय नसणाऱ्या मानसीने अतिशय उत्तम नृत्य सादर केले, संपूर्ण अंधत्व असणाऱ्या विदयार्थ्यानी नाटक सादर केले तर ऐकू न येणारी मुले सांकेतिक भाषेच्या आधारे गाणं सादर करत होते हे पाहुन उपस्थित भारावून गेले.विद्यार्थ्यांचे पूजन डॉ.विद्या गायकवाड, कुसुम पगारिया, स्मिता मोहिते, रिद्धी जैन, हेमलता अमळकर, दीप कोठारी, वर्षा अडवाणी, सुनीता पाटील ( पाचोरा ), कविता झाल्टे, अमिषा डाबी, शिरीन मुल्ला, शर्वरी महाजन, डॉ.संगीत संघवी यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी , पुखराजजी पगारिया, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, महानगर पालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, डी.एस.पाटील, नंदू अडवाणी, दीपस्तंभचे उपाध्यक्ष डॉ. राजेश डाबी, भरतदादा अमळकर, नीळकंठ गायकवाड, डॉ.प्रवीण शुक्ला उपस्थित होते.औरंगाबाद ग्लोबल एक्सपर्टचे प्रशांत देशपांडे यांनी प्रकाश पूजन या कार्यक्रमासाठी देणगी दिली होती. अमिषा डाबी यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार नवीन कपडे घेण्यात आले.दिवाळीच्या फराळासाठी कविता झाल्टे आणि प्रमोद संचेती यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध गझलकार डॉ.प्रवीण उर्फ तन्मय शुक्ला यांच्या ‘मृगतृष्णा’ या हिंदी गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. दीपस्तंभ फाऊंडेशनच्या वाटचालीत महत्वाचे योगदान दिल्याबद्दल पुखराजजी पगारिया आणि कुसुम पगारिया यांचा विशेष सन्मान आणि सत्कार करण्यात आला. अपंगत्वार मात करत सौरक्षण खात्यात नोकरी मिळवत यश मिळवणाऱ्या किरण पाटीलचा सहपरिवार या वेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिवा परमार आणि पंकज गिरासे यांनी तर आभार यजुर्वेंद्र महाजन यांनी मानले.