चोपडा तालुक्यात वादळाचा तडका, घरांवरील पत्रे उडाली

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । चोपडा तालुक्यातील काही भागात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अचानक वादळ आल्याने धावपळ उडाली. वादळात तालुक्यातील माचले येथील पावरा वस्तीमध्ये काही घरांवरील पत्रे उडाली. तसेच काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. दरम्यान, नुकसानाची माहिती तहसीलदारांना देण्यात आली.

चोपडा तालुक्यातील माचले येथे आदिवासी लोकांची वस्ती आहे. या भागात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अचानक वादळ आल्याने धावपळ उडाली. या वादळामुळे सुनील तेरसिंग बारेला, रोहिदास बारकू भिल, निंबाबाई पंढरीनाथ भिल, शिवा बारकू भिल याच्या घरांची पत्रे उडाली. उपसरपंच नितीन निकम यांनी झालेल्या नुकसानाची माहिती तहसीलदार अनिल गावित यांना दिली. चोपडा शहर व तालुक्यात सायंकाळी हलक्या सरी बरसल्या. तसेच धानोरा परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली.