जळगाव लाईव्ह न्यूज । धावत्या रेल्वेतून प्रवाशाची बॅग लांबवून त्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी आरोपी शरद विश्वासराव तायडे यास भुसावळ रेल्वे न्यायालयाने दोषी ठरवून त्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. येथील रेल्वे न्यायालयात ९ वर्ष हा खटला चालला.

६ जानेवारी २०१५ रोजी फिर्यादी कादर शेख हे त्यांचे पत्नीसह राजेंद्रनगर एक्स्प्रेसने कल्याण ते रावेर असा प्रवास करीत होते. भुसावळ जंक्शनवरून गाडी सुटल्यावर आरोपी शरद तायडे (रा. अमरावती) याने कादर शेख झोपेचा फायदा घेत त्यांची बॅग चोरली. बॅगेत सोन्याचे दागिने व अन्य सामान असा रुपये ७८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाले.
हा खटला भुसावळ न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. रेल्वे बी.साळुंके यांचे न्यायासनापुढे चालला. सरकारी अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. नितीन खरे यांनी एकूण ५ साक्षीदार तपासले. फियांदी कादर शेख, हवालदार नितीन पाटील, हवालदार प्रमोद जंजाळकर, प्रमोदकुमार चिकलमुंडे व पीएसआय शब्बीर शेख यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील खरे यांचा युक्तीवाद ग्राह्य घरून न्यायाधीश साळके यांनी आरोपी शरद तायडे यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली . या खटल्यात सरकारी वकील अॅड . खरे यांना लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, पैरवी अधिकारी गणेश शिरसाठ यांचे सहकार्य लाभले.