मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

जळगाव शहर वासियांसाठी आजच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । जळगाव शहर वाशियांना पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. महापारेषणच्या १३२ केव्ही उपकेंद्रात शनिवारी दुरुस्तीचे काम हाती घेतले असून यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होणार असल्यामुळे आज शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा होणार नाही. शनिवार ऐवजी रविवारी पुरवठा होईल.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे महापारेषणच्या १३२ केव्ही उपकेंद्रात देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १६ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

त्यामुळे जळगांव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यांत येत असून दि.१७ रोजीचा पाणी पुरवठा दि.१८ रोजी करण्यांत येईल.तसेच दि.१८ रोजी व १९ रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि.१९ व २० रोजी करण्यात येईल. तरी नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने कराबा व महापालिकेस सहकार्य करावे असे पाणी पुरवठा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.