---Advertisement---
महाराष्ट्र जळगाव जिल्हा

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ; प्रशासनाने घेतला हा निर्णय, ३० जूनपर्यंत..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२५ । रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे पावसाळा आणि त्यानंतर उद्धभवणार्‍या अडचणी लक्षात घेता आता तीन महिन्यांचे रेशन एकदाच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना यावेळेस एकदाच रेशन घ्यावे लागणार आहे. दरम्यान, जून महिन्याचे रेशन लाभार्थ्यांनी त्वरित घ्यावे व जुलै आणि ऑगस्टचे धान्य येत्या ३० जूनपर्यंत उचल करावेत, असे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

ration card

अंत्योदय आणि प्राधान्यक्रम लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने धान्यपुरवठा केला जातो. आगामी काळात पावसाला सुरुवात होणार आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवरील सर्व क्षेत्रीय यंत्रणांना यासंदर्भाने याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार धान्य वितरित करण्यासाठी जिल्हा पातळीवरून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

---Advertisement---

अतिवृष्टी, पुरामुळे अडचणी येऊ नये यासाठी…
पावसाळ्यात पूरस्थिती, अतिवृष्टीने लाभार्थ्यांना धान्य मिळण्यात अडचणी येऊ नये, यादृष्टीने शासनाने ही उपाययोजना केली आहे, तरी लाभार्थ्यांनी येत्या ३० जूनपर्यंत आपल्या हिश्श्याचे धान्य त्वरित उचल करावेत, असे आवाहन पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांना करण्यात आले आहे.

३० जूनच्या आधीच धान्याची उचल करा
तीन महिन्यांचे रेशन धान्य लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंतच घ्यायचे आहे. तरी जून महिन्याचे धान्य त्वरित घ्यावे जेणेकरून जुलै व ऑगस्टचे धान्य रेशन दुकानात लवकरच पोहोच करण्यात येईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment