महत्वाचे : मंत्री गिरीश महाजन यांनी नाकारली वाय+ सुरक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । राज्य सरकारने राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ०९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय+ (Y+) सुरक्षा त्यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी हि सुरक्षा नाकारली आहे. त्याची याबाबत पोलीस महासंचालकांना माहिती दिली आहे.

सध्या राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा नेहमी तत्पर असते. मात्र राज्यातील पोलिस यंत्रणेची उपलब्ध संख्या तसेच पोलिस कर्मचाऱ्यांवरिल वाढता कामाचा ताण याचबरोबर पोलिस विभागातील वाहनांची कमतरता या सर्व बाबींचा विचार करता मला पुरवण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात यावी असं महाजन यांनी पत्रा द्वारे कळविले आहे.

या पत्राची दखल घेत संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावेत असे मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिस महासंचालक यांना पाठवलेल्या पत्रातून मागणी केली आहे.