---Advertisement---
जळगाव जिल्हा

चांगदेव महाराज यात्रेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे निर्णय व निर्देश

changdev yatra
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चांगदेव महाराज मंदीर (Changdev Maharaj), मेहुण, कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील वार्षिक यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारीआयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

changdev yatra

बैठकीस मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, मंदिर समितीचे सन्माननीय पदाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ ,स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---

महत्वाचे निर्णय व निर्देश:
यात्रेच्या काळात भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष नियोजन, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना.प्रशासनाने यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी पूर्ण कटिबद्ध असल्याचे सांगत सर्व संबंधित विभागांना योग्य ती तयारी करण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले. भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासन, मंदिर समिती आणि पोलिस विभाग एकत्रितपणे कार्यरत राहणार आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---