---Advertisement---
महाराष्ट्र

महत्वपूर्ण निणर्य : मेडिक्लेमसाठी २४ तास रुग्णालयात दाखल होणे आवश्यक नाही

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । मेडिकल इन्शुरन्स क्लेमसाठी २४ तास रुग्णालयात दाखल होणे आवश्यक नाही. आता काळ बदलला आहे, असे स्पष्ट करत वडोदराच्या ग्राहक मंच न्यायालयाने विमा कंपनीला त्याच्या ग्राहकाला भरपाई देण्याचे आदेश दिले.

mediclem jpg webp webp

बडोदा येथील रमेशचंद्र जोशी यांच्या याचिकेवर ग्राहक मंचाने हा निर्णय दिला. जोशी यांनी २०१७ मध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. कंपनीने त्यांचा विम्याचा क्लेम देण्यास नकार दिला होता. जोशी यांच्या पत्नीला २०१६ मध्ये डर्माटोमायोसायटिसचा त्रास झाला झाल्याने त्यांना अहमदाबाद येथील लाइफकेअर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल केले होते. उपचारानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

---Advertisement---

जोशी यांनी यासाठी विमा कंपनीकडे ४४,४६८ रुपयांचा क्लेम केला. नियमानुसार रुग्णाला २४ तासांपर्यंत दाखल करण्यात आले नसल्याचा युक्तिवाद करून कंपनीने क्लेम नाकारला होता. फोरमने विमा कंपनीला क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून ९ टक्के व्याजासह ४४,४६८ रुपये जोशी यांना देण्याचे आदेश दिले. मानसिक त्रासापोटी ३ हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी २ हजार रुपये देण्याचे आदेशही दिले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---