“आपली पेंशन आपल्या दारी” योजना घरोघरी राबवा : अभिजित राऊत
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या वयवृध्द, विधवा, दिव्यांग महिलांसाठी विविध योजनेचा लाभ विशेष सहाय्य योजनेंतर्गत १०० टक्के लाभार्थ्यांना “आपली पेंशन आपल्या दारी” या योजने अंतर्गत अर्थसहाय्य घरपोच वाटप करण्यात यावे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
“विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुंटुब अर्थसहाय्य या योजना राबविल्या जातात. दिव्यांग, वयोवृध्द, अनाथ बालके, दुर्धर आजारी व्यक्ती, एकल महिला इत्यादी हे या योजनांचे लाभार्थी आहेत.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि. १६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जळगाव जिल्हयात १ जुलै, २०२२ पासून विशेष सहाय्य योजनेच्या १००% लाथार्थ्यांना “आपली पेंशन आपल्या दारी” या योजने अंतर्गत अर्थसहाय्य घरपोच वाटप करण्याचे आव्हान केले आहे.
ही योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी गावनिहाय विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांची याबाबत तलाठी व इंडिया पोस्ट बॅकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी गावात बैठक घ्यावी. लाभार्थ्याना सदर योजना समजावून सांगावे अश्या हि सूचना जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.