⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोरा व भडगाव तालुक्यातील कृषिपंपांचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा : भाजप

पाचोरा व भडगाव तालुक्यातील कृषिपंपांचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा : भाजप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सुरू असताना पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा अनियमित पद्धतीने व कमी दाबाने होत आहे. त्यामुळे सुरळीत करून दिवसा किमान ०८ तास वीज पुरवठा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपातर्फे येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यकारी अभियंता पाचोरा भाग, पाचोरा यांना देण्यात आले.

शिंदे म्हणाले की, पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी महावीतरणाकडुन वारंवार येणाऱ्या वीज समस्यांमुळे मोठ्या संकटात सापडले असून तालुक्याचे आमदार किशोर पाटील हे या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. दुसऱ्यांदा आमदार होऊन त्यांना अडीच वर्षे झाली. शेतकऱ्यांच्या जीवावर ते आमदार झाले असून त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही घेणे देणे नाही. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा अनियमित पद्धतीने व कमी दाबाने होत आहे. त्यामुळे सुरळीत करून दिवसा किमान ०८ तास वीज पुरवठा करण्याबाबत तात्काळ संबंधित विभागांतील अभियंत्यांना सूचना देऊन वरील समस्या मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य मधुकर काटे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, पं.स. सभापती वसंत गायकवाड, पं.स. मा. सभापती व सदस्य बन्सीलाल पाटील, पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार, सरचिटणीस गोविंद शेलार, नगरसेवक विष्णू अहिरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, वीरेंद्र चौधरी, योगेश ठाकूर, प्रशांत सोनवणे, मच्छिंद्र पाटील, अमोल नाथ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह