⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | भडगाव मतदारसंघातील पाट बंधारे तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा…

भडगाव मतदारसंघातील पाट बंधारे तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । भडगाव तालुक्यातील पाट बंधारे दुरुस्ती ची कामे तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा असा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला. याबाबत जळगाव पाटबंधारे विभागाला १९रोजी निवेदन देण्यात आले.

सन 2021 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघातील ल. पा. तलाव घोडसगाव, को. प बंधारा कजगाव, पथराड कालवा आदी बंधारा व धरणांची भिंत व इतर भाग क्षतीग्रस्त झाले. महापुरामुळे ल. पा. तलाव घोडसगाव तसेच पिंपळगाव हरेश्वर, सावखेडा, वरखेडी आदी गावांना धोका निर्माण झाला होता. तसेच तीतूर नदीला आलेल्या महापुरामुळे को. प. कजगाव बंधाऱ्याच्या डाव्या कडील भागाने पाण्याने मार्ग बदल्याने भराव वाहून गेला. तसेच (डि. एस.) भिंत पडून गेली. पथराड कालवा देखील फुटून गेला. याबाबत दि. ४एप्रिल रोजी अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सदर तलावाचे व बंधाऱ्याचे कामे तातडीने दुरुस्त करण्यात येतील असे आश्वासित केले. मात्र, पावसाळा हप्ताभरावर येऊन ठेपला आहे. तरी प्रशासनाने गांभीर्याने त्याची दखल घेतली नाही. भविष्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर, सावखेडा, वरखेडी, कोळगाव, पथराड, घुसर्डी, दिघी आदी गावांना प्रचंड प्रमाणावर धोका निर्माण होईल शेतीचे पिकांचे तथा जीवित हानीदेखील होऊ शकते.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच जयंत पाटील जलसंपदामंत्री यांच्याशी वारंवार बैठका घेऊन गंभीर व भयावह परिस्थिती लक्षात आणून दिली. तरी वरील ल. पा. तलाव घोडसगाव, को.प. कजगाव बंधारा, पथराड बंधारा आदी तातडीने दुरुस्ती ची कामे दि. २१मे २०२२ पर्यंत सुरू करण्यात यावे, अन्यथा २३मे पासून जनहितासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह