---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

उन्हाची तीव्रता पुन्हा वाढणार! जळगावसह राज्यातील हवामानाबद्दल IMD कडून मोठी अपडेट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२४ । काही दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यातील अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळेल. जळगाव जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. आता यादरम्यान राज्यातील पावसाबाबत हवामान खात्याने मोठी दिली आहे. राज्यातील पाऊस ओसरणार असून पुढच्या चार दिवसांत तापमानात वाढ होऊन उन्हाची तीव्रता वाढणार आहे.

weather update

मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टपर्यंत म्हणजे या चार दिवसांत नांदेड वगळता मराठवाडा, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या १३ जिल्ह्यात हळूहळू पावसाचा जोर कमी होवून दुपारी ३ वाजताच्या सुमारास कमाल तापमानात वाढ होईल आणि हळूहळू उन्हाची ताप वाढण्याची शक्यता जाणवेल.

---Advertisement---

पावसाचा जोर पुन्हा वाढणार?
शनिवार ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंतच्या सहा दिवसांत संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक आणि मुंबई अशाया १६ जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. राज्यातील ऊन- पावसाचा खेळ लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यांवी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

जळगावातही तापमानात वाढणार
दरम्यान, जळगावात मागील चार पाच दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. मात्र आज मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरून तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, २७ ऑगस्टपासून पावसाला अल्प ब्रेक लागेल. २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान उन्ह, सावली आणि ढगाळ वातावरण राहील. तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होऊन कमाल तापमान ३३ ते ३५ अंशांवर स्थिरावण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---