---Advertisement---
बातम्या

जळगावसह धुळे जिल्ह्याला यंदा प्रथमच पावसाचा येलो अलर्ट : आज मुसळधार पावसाचा इशारा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : 8 सप्टेंबर 2023 : गेल्या तीन आठवड्याच्या ब्रेकनंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यात पाऊस परतला आहे. यामुळे शेतकरी सुखवाला असून खरीपच्या पिकांना जीवनदान मिळाले. दरम्यान,सध्या राज्यात सर्वत्र मान्सून सक्रीय झाल्यामुळे रविवारपर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम पाऊस असणार आहे. मात्र यंदा प्रथमच जळगावसह धुळे जिल्ह्याला आज शुक्रवारी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMG 20230908 092817 jpg webp webp

ऑगस्टच्या सुरुवातीपासून जळगाव जिल्ह्यासह राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. जुलै महिन्यात झालेल्या पावसावर खरीपच्या पेरण्या झाल्या होत्या. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी पिके करपू लागली होती. यामुळे शेतकरी मिठ्या संकटात सापडलं होता. शेतकऱ्यांसह सर्वांचे डोळे आभाळ्याकडे लागले होते.

---Advertisement---

हवामान खात्याने राज्यात या आठव्यात पाऊस परतनार असल्याचे म्हटलं होते. आता हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. मोठ्या ब्रेकनंतर मान्सून परतला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

मान्सून सक्रीय होण्यासाठी बंगालच्या उपसागरात बदललेली परिस्थिती कारण ठरली आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या चक्रवाताच्या परिस्थितीसोबत अरबी समुद्रावरुन पश्चिमी वारे वाहू लागले आहे. यामुळे राज्यात सर्वत्र मान्सून सक्रीय झाला आहे. यामुळे रविवारपर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम पाऊस असणार आहे. परंतु आज शुक्रवारी धुळे आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

पावसाचा जोर आणखी दोन, तीन दिवस कायम राहणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर मान्सून परतला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. आता सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला तर राज्यातील धरणांमध्ये जलसाठा चांगला होईल. यामुळे रब्बी हंगाम चांगला होण्याची अपेक्षा आहे. आता पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---