⁠ 
शनिवार, जून 29, 2024

IMD Rain Alert : आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट ; जळगावला महत्त्वाचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२४ । राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा कायम असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने आज (दि १२) पालघर वगळता संपूर्ण राज्यात पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

जळगावात पावसाची हजेरी
दरम्यान, जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. रात्री एक नंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. आज रविवारी (दि १२) सकाळपासून ढगाळ वातावरण असून आगामी दोन दिवस जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याकाळात ढगाळ वातावरणामुळे तापमानात देखील घसरण दिसून येणार असून उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळणार आहे. आगामी दोन दिवस कमाल तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस एवढं राहण्याचा अंदाज आहे

image 2

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
वाशिम, नागपूर, बुलढाणा, अमरावती अकोला, पुणे, लातूर, नांदेड, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथे पावसासोबत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

image 3
IMD Rain Alert : आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट ; जळगावला महत्त्वाचा इशारा 1