जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२३ । बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून यामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, हवामान विभागान आज अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २६ जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज पडू शकतो.
जळगावात कशी राहणार पावसाची स्थिती?
मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. सकाळपासून दुपारपर्यंत ऊन सावलीचा खेळ आणि सायंकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, आज हवामान खात्याकडून पावसाचा जिल्ह्याला कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीय. मात्र सायकांळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यामधील अनेक तालुक्यात उद्या २६ आणि २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शकता आहे.