जळगाव लाईव्ह न्यूज। 7 एप्रिल २०२२। येथील विद्यूत कॉलनी परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई करीत पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत कॉलनी परिसरातून ट्रॅक्टर (एमएच १९, एएन १९८७) आणि विना नंबरची ट्रॉलीतून विनापरवाना वाळूची वाहतूक करत असताना बुधवार ६ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता गस्तीवर असलेले रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी पकडले. वाळू वाहतूकीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता वाहतुकीचा कोणताही परवानगी नसल्याचे ट्रॅक्टर चालकाने सांगितले. दरम्यान रामानंदनगर पोलिस ठाण्यात वाळूने भरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली पोलीसांनी जप्त केली आहे. पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांच्या फिर्यादीवरून बुधवार ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक राजेंद्र सोनवणे रा. खेडी कढोली ता.जि.जळगाव आणि प्रभाकर सोनवणे रा. रिंग रोड जळगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाही जितेंद्र तावडे करीत आहेत.