⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | यावल येथे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

यावल येथे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरातील आठवडे बाजाराजवळ अवैध वाळू तस्करी करणाऱ्या विना क्रमांकाच्या डंपरवर यावल महसुल विभागाने कारवाई केली. गाडी चालकाचे नाव रतिलाल मच्छिद्र साळुंखे रा.कोळन्हावी असे आहे.

यावल महसुल विभागाने डंपर चालकास ताब्यात घेतले आहे. कारवाई तहसिलदार महेश पवार , एम एच तडवी मंडळ अधिकारी फैजपुर, एस.व्ही. सुर्यवंशी अंजाळे तलाठी, ईश्वर कोळी तलाठी यावल, समीर तडवी परसाडे तलाठी, व्ही.बी.नागरे तलाठी ददिगांव, यु.यु.बांभुळकर टाकरखेडा तलाठी, वसीम तडवी डोंगर कठोरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डंपरमध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू, सरकारी भावानुसार चार हजार रुपये इतका मुद्देमाल होता. पथकाने पंचनामा करून डंपर ताब्यात घेतले आहे.

डंपर पकडल्याने यावल परिसर आणि वाळुमाफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात रात्री १० वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा :

author avatar
Tushar Bhambare