⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

यावल तालुक्यात अवैध अति ज्वलनशील बायोडीझेजल विक्री

जळगाव लाईव्ह न्यूज । सुरेश पाटील । यावल तालुक्यात अवैध ज्वलनशील बायोडिझेल सर्रासपणे उघडपणे महामार्गावर विक्री होत आहे. त्याचप्रमाणे घरगुती वापराचा गॅस विविध प्रकारच्या वाहनांमध्ये आणि व्यावसायिक ठिकाणी वापरला जात आहे. याच बरोबर तालुक्यात काही अपात्र लाभार्थ्यांना दारिद्ररेषेखालील रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य मालाचा पुरवठा करण्यात येत असल्याने आणि खऱ्या गरजू लाभार्थ्यांना रेशन दुकानदारांकडून मंजूर नियतनानाप्रमाणे धान्य न देता कमी प्रमाणात धान्य वितरित करण्यात येत असल्याने याकडे यावल तहसीलदार आणि यावल पुरवठा विभाग यांची अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल तालुक्यातून होत आहे. तसेच अवैध बायोडिझेल विक्रीबाबत काल दि.24 रोजी यावल तहसीलदारांकडे लेखी तक्रार देण्यात आल्याने तालुक्यात यावल तहसीलदार आणि पुरवठा विभाग यांचे दुर्लक्ष नेमके कोणत्या उद्देशाने होत आहे याबाबत तालुक्‍यात चर्चा सुरू आहे.

तालुक्यातील गायत्री सप्लायर्स इंडियन ऑईल डीलर्स यांनी व पेट्रोल पंप चालकांनी यावल तहसीलदार व संबंधित अधिकारी यांना मंगळवार दि.24 ऑगस्ट2021रोजी दिलेल्या लेखी निवेदनात यावल तालुक्यातील अवैध बायोडिझेलच्या नावे अति ज्वलनशील पदार्थ विक्री होत असले बाबत विषयान्वये म्हटले आहे की,यावल तालुक्यात चोपडा रोड व भुसावळ रोडवर अनधिकृत बायोडिझेल विक्री सर्रासपणे चालू आहे त्याला शासनाची कुठलीही मान्यता नसताना किंवा कोणताही परवाना नसताना बायोडिझेलच्या नावे ज्वलनशील पदार्थ ठोक प्रमाणात विक्री होत आहे.

यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल प्रतिमहा बुडत आहे सरकारच्या तिजोरीतील उत्पन्नात घट होते,तसेच हा ज्वलनशील पदार्थ अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात साठवीला जात असल्यामुळे त्यामुळे एखाद्यावेळेस नजरचुकीने काही अप्रिय,अनर्थ घटना घडली तर जिवित व नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते अशा प्रकारची जीवीत व नैसर्गिक हानी झाल्यास याला जबाबदार कोण राहील?
अशा गुंड व शासना विरोधी कारवाया न थांबल्यास अशा प्रवृत्तीची हिम्मत वाढेल व भविष्यात याचे दुष्परिणाम पाहावे लागतील व त्यास आपण सर्व जबाबदार राहू म्हणून आपण तात्काळ दखल घेऊन तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून या प्रकरणांमध्ये स्वतःलक्ष घालून अशा प्रवृत्तीचा नाश करावा व तालुक्यातील जनतेने सहकार्य करावे अशी अपेक्षा लेखी निवेदन देणाऱ्यानी व्यक्त केली आहे.

निवेदना व्यतिरिक्त दुसरा विषय म्हणजे यावल शहरासह तालुक्यात घरगुती वापराचा गॅस अनधिकृतपणे दुचाकी,चारचाकी वाहनांमध्ये सर्रासपणे वापरला जात आहे,घरगुती वापराचा गॅस अशाप्रकारे वाहनांमध्ये भरण्यासाठी, विक्री करण्यासाठी 1000 रुपये प्रति दराने गॅस हंडी कोण कोणाला विक्री करत आहे? त्या गॅस हंड्या कोणकोणत्या ग्राहकांच्या नावाने कोण बुक करून कुठे रवाना करीत असतात वाहनधारक नेमक्या कोणत्या ठिकाणी कोणत्या मशीनच्या माध्यमातून वाहनांमध्ये गॅस भरणार करीत आहेत तसेच अनेक व्यवसायिक आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घरगुती वापराचा गॅस वापरत आहे.

त्याचप्रमाणे तालुक्यात स्वस्त धान्य वाटप करताना संबंधित काही रेशनिंग दुकानदार मंजूर नियोजनाप्रमाणे रेशन कार्डधारकांना धान्य वाटप न करता कमी प्रमाणात वाटप करीत आहेत ग्राहकांना कॅश मेमो दिला जात नाही, अनेक रेशन दुकानांवर शिल्लक साठा,धान्य विक्रीचा उल्लेख याचे फलक लावलेले नाहीत,पुरवठा विभाग संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिका आणि यावल तहसीलदार यांच्या दुर्लक्षपणामुळे तालुक्यात अनेक अपात्र बोगस दारिद्र रेषेखालील लाभार्थी आहेत या बोगस अपात्र लाभार्थ्‍यांची चौकशी अद्याप पर्यंत यावल तहसीलदार आणि पुरवठा विभागाने का केलेली नाही.

तालुक्यात रेशन दुकानदार रेशनिंगचा माल मंजूर नियतातना उचल करतात परंतु खऱ्या गरजू लाभार्थ्यांना प्रत्यक्षात स्वस्त धान्य दुकानातून रेशनिंग धान्य पुरेशा प्रमाणात मिळते आहे किंवा नाही याबाबतची चौकशी आणि दप्तर तपासणी कशा प्रकारे केली जाते याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत तरी याकडे प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून चौकशी करून कारवाई करावी असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.