---Advertisement---
मुक्ताईनगर

मुक्ताईनगरात पुन्हा लाखोंचा अवैध पानमसाला पकडल्याने खळबळ

---Advertisement---

जळगांव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे | बऱ्हाणपुरहुन छत्रपती संभाजीनगर कडे साडे-तेरा लाखांचा अवैध सुगंधित पानमसाला घेऊन जाणाऱ्या महिंद्रा बोरोलो पिक अप वाहनावर अन्न व औषध प्रशासनाने काल दि २८ रोजी पहाटे सहा वाजता कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.अवैध पानमसाला प्रकरणी कारवाईचे सत्र सुरुच असुन महिनाभरातील हि चौथी कारवाई आहे.यामुळे अवैध पानमसाला वाहतुकदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

उष्णतेने घामाघूम झालेल्या जळगावकरांना मिळेल दिलासा

panmasala jpg webp webp

बऱ्हाणपुर हुन छत्रपती संभाजीनगर कडे अवैधरीत्या पानमसाला घेऊन जाणाऱ्या वाहनाविषयी मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार अन्न व औषध प्रशासन अधिकारी रामचंद्र भरकड यांनी सहकाऱ्यांसह मुक्ताईनगर परीसरात ठिकठिकाणी शिताफीने सापळा रचला.दरम्यान २८ रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर-मलकापुर हायवे वरील पिंप्री आकाराऊत जवळील हाॅटेल ओम साई जवळ वाहन महिंद्रा बोलेरो पिक अप क्र.एम एच २० जीसी २९६७ थांबवुन बघितले असता, प्रिमियम राजनिवास सुगंधित पानमसाला व जाफरानी जर्दा असा एकुण १३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा माल व वाहन अंदाजित किंमत ४ लाख ५० हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

---Advertisement---

आरोपी वाहन चालक सचिन भीमराव कोलते (वय-३३), क्लिनर सुभाष रंगनाथ कनसे (वय-४५) दोघे रा.दिपक लान समोर हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,पानमसाला अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेत वाहन व दोघा आरोपींना मुक्ताईनगर पोलीसांच्या ताब्यात असुन पुढील तपास एपीआय प्रदिप शेवाळे करीत आहे. दिड-महिनाभरात हि चौथी कारवाई असल्याचे समजते.यामुळे अवैध वाहतूक दारांचे धाबे दणाणले आहेत.

आज सोने-चांदीचा दर काय?

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---