शरद पवारांना विठ्ठल म्हणाल तर रस्त्यावर उतरु : भाजपचा अजित पवार गटाला ईशारा !
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । अजित पवार यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता भाजपाने अजित पवार गटाला डीवचल आहे. याचे कारण म्हणजे. शरद पवार यांना विठ्ठल म्हणून संबोधणं तत्काळ थांबवा नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिला आहे.
पक्षात पडलेल्या उभ्या फुटी नंतर अजित पवार गट शरद पवार हे चे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, असा आरोप करत आहेत. मात्र शरद पवार यांना विठ्ठल म्हणून संबोधणं तत्काळ थांबवा नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिला आहे.
महाराष्ट्राचे अराजध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभतं का? म्हणून शरद पवारांना विठ्ठल संबोधणं तात्काळ थांबवा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात आंदोलनं करावी लागतील, असे तुषार भोसले म्हणाले आहेत.