⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | विशेष | तुम्हालाही दिसत असतील स्वप्नात मासे तर…. वाचा सविस्तर

तुम्हालाही दिसत असतील स्वप्नात मासे तर…. वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । आपणं पाहत असलेली स्वप्ने आपल्या भविष्याशी संबंधित असतात. यामुळे स्वप्न खूप महत्वाची असतात. झोपेत येणाऱ्या स्वप्नांचे स्वतःचे महत्त्व असते. स्वप्नशास्त्रानुसार, रात्री येणारे स्वप्न तुमच्या भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत सतत. यामुळे स्वप्नांकडे गांभीर्यानने पाहायला हवे.

स्वप्ने कशी घडू शकतात? काही स्वप्ने खूप चांगली असतात, तर काही खूप वाईट. आपल्यापैकी बरेच जण रात्रीच्या गाढ झोपेत येणारी स्वप्ने विसरतात. स्वप्नांच्या दुनियेत आपण तेही करतो, जे सामान्य जीवनात करणे कठीण असते. काही लोकांना त्यांच्या स्वप्नात विविध प्रकारचे प्राणी आणि माशासारखे जलचरदेखील दिसतात.

स्वप्नशास्त्रात असे सांगितले आहे की, स्वप्नात मासे दिसणे हे एक अतिशय महत्त्वाचे लक्षण आहे. स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर ते शुभ संकेत मानले जाते. हिंदू धर्मात माशाचा संबंध संपत्तीची देवी लक्ष्मीशी आहेस्वप्नशास्त्रात सांगितले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासे वारंवार दिसत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की, लवकरच त्याच्या हातून काही धार्मिक कार्य होणार आहे.

माशासोबत पोहताना दिसणे : काही लोक स्वप्नातही पाण्यात माशांसोबत पोहताना दिसतात. स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की, लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुमचे भाग्य बदलणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात विविध प्रकारचे मासे किंवा रंगी बेरंगी मासे दिसत असतील तर दिसले तर याचा अर्थ असा की, लवकरच तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल आणि तुमची आर्थिक स्थिती वाढेल. स्वप्नात मासे पाहणे म्हणजे धार्मिक कार्यात तुमची आवड वाढत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह