⁠ 
रविवार, मे 19, 2024

‘या’ गोष्टी पाळल्यात तर तुम्हाला होणार नाही डोळ्यांचं इन्फेक्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. परिणामी, व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला, ताप अशा लहानसहान आजारपणं डोकं वर काढतात. पावसाळ्यात अस्वच्छता अधिक प्रमाणात वाढत असल्याने व्हायरल इन्फेक्शन वाढत आणि ते डोळ्यातही पसरू शकत.

लक्षण
डोळ्यात खाज येणे डोळ्याच्या व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत असल्यास सतत डोळ्यात खाज येणं, जळजळ जाणवणं, हा त्रास जाणवतो. यामुळे एका डोळ्यातून किंवा दोन्ही डोळ्यांतूनही चिकट, पांढरा स्राव वाहतो..

पापण्यांवर सूज जाणवणं व्हायरल आय इन्फेक्शनचे अजून एक लक्षण म्हणजे पापण्यांवरील सूज. डोळ्यांमध्ये सतत दाह जाणवत असल्यास परिणामी पापण्यांवर सूज येण्याचे प्रमाण वाढते. पापण्यांवरील सूज कमी करण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेसचा वापर करा; पण एक-दोन दिवसांमध्ये त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांकडून योग्य निदान करा.

कोणती काळजी घ्याल?
पावसाळ्याच्या दिवसात स्वच्छतेकडे जरूर लक्ष द्या. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने औषधं घेऊ नका. नियमित हात साबणाने स्वच्छ करा. सतत डोळ्यांना हात लावणं, डोळे चोळणं टाळा. • तुम्हाला फ्लू किंवा आय इन्फेक्शनचा त्रास ह असेल तर ते कमी करण्यासाठी मुबलक आय इन्फेक्शन असलेल्या व्यक्तीपासून दूर राहा.