IDBI बँकेत 1544 पदांची मेगा भरती, नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी…

IDBI Bank Recruitment 2022 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI Bank Limited)IDBI बँकेने कार्यकारी आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पदवी पास उमेदवारांना नोकरीची ही मोठी संधी आहे. 3 जून 2022 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहेत. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे.

एकूण 1544 पदे भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 1044 पदे कार्यकारी आणि 500 ​​पदे सहाय्यक व्यवस्थापक आहेत.

शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष पात्रता असलेले उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करू शकतात. भरतीच्या अधिसूचनेमध्ये शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक तपशील पहा.

वय श्रेणी
कार्यकारी पदांसाठी 20 ते 25 वर्षे आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी 21 ते 28 वर्षे अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे दोन्ही पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. यासोबतच असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी वैयक्तिक मुलाखतही होणार आहे. भरतीशी संबंधित सर्व माहिती त्याच्या अधिसूचनेमध्ये तपासली जाऊ शकते. अधिसूचनेची थेट लिंक खाली दिली आहे.

वेतनमान (Pay Scale) : २९,०००/- रुपये ते ३४,०००/- रुपये.

जाहिरात (Notification): पाहा