जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकांमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १ मार्चपासून अधिकृत वेबसाइटवर सुरू होईल. त्याच वेळी, अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२५ आहे.या भरतीद्वारे ६५० जागा भरल्या जाणार आहे. (IDBI Bank Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता काय?
अर्ज जाणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच, प्रादेशिक भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] (IDBI Bank Bharti)
परीक्षा शुल्क : या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये भरावे लागणार आहे.
निवड कशी होईल?
भरतीसाठी निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी घेतली जाईल. परीक्षेत लॉजिकल रिझनिंग, मॅथ्स, बँकिंग, डेटा इंटरप्रिटेशन इत्यादी विषयांमधून एकूण २०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. ०.२५ निगेटिव्ह मार्किंग असेल. त्याचबरोबर, यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.