⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

IBPS RRB Bharti : तरुणांनो संधी सोडू नका ; सरकारी बँकांमध्ये तब्बल 8081 जागांसाठी भरती, असा करा अर्ज?

IBPS RRB मार्फत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी ही चांगली संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी संपूर्ण माहितीसाठी अधिकृत वेबसाइट ibps.in वर जारी केलेली अधिसूचना तपासली पाहिजे.

या भरती मोहिमेद्वारे प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये 8081 रिक्त जागा भरल्या जातील. प्रत्येक भरतीसाठी वेगवेगळे निकष आहेत. उमेदवार ज्या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहे त्यासाठी मागितलेली माहिती तपासा, त्यानंतरच अर्ज प्रविष्ट करा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२२ आहे

अधिसूचनेनुसार, 43 बँका IBPS RRB भर्तीमध्ये सहभागी होतील. सर्व बँकांमध्ये प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या जागा आहेत आणि त्यांची भरती IBPS द्वारे केली जात आहे. उमेदवारांना विहित अर्ज शुल्क देखील भरावे लागेल.

पदसंख्या : 8081

पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या :

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 4483
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 2676
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 12
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 06
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 10
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) 18
7) ऑफिसर स्केल-II (CA) 19
8) ऑफिसर स्केल-II (IT) 57
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 745
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 80

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जून २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

या पद्धतीने करा अर्ज

पायरी 1- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा किंवा दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
पायरी 2- मुख्यपृष्ठावर “CRP RRB-XI साठी ऑनलाइन अर्ज” वर क्लिक करा.
पायरी 3- तुमच्या आवडीची पोस्ट निवडा आणि नोंदणी करा आणि फॉर्म पूर्ण करा.
पायरी 4- आता अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
पायरी 5- शेवटी भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा