⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | आली रे आली नोकरीची संधी आली..! सरकार बँकांमध्ये तब्बल 6000+ जागांसाठी भरती

आली रे आली नोकरीची संधी आली..! सरकार बँकांमध्ये तब्बल 6000+ जागांसाठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IBPS Clerk Notification 2022 : बँकेत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहेत. ती म्हणजे Institute of Banking Personnel (IBPS) मार्फत लिपिक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना (IBPS Clerk Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. लिपिक पदांच्या तब्बल 6000+ जागा रिक्त आहेत. ज्यांना अर्ज करायचा आहे ते IBPS वेबसाइटवर म्हणजेच ibps.in वर जाऊन करता येईल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी आज म्हणजे १ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२२ आहे. (IBPS Clerk Bharti 2022)

प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी IBPS लिपिक मुख्य परीक्षा 08 ऑक्टोबर 2022 रोजी घेतली जाईल. 2021 मध्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँका बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ इंडिया आहेत. महाराष्ट्रात ७८५५ पदे भरण्यात आली.

पदाचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
तसेच नोंदणीच्‍या दिवशी तो/ती पदवीधर असल्‍याचे आणि ऑनलाइन नोंदणी करताना ग्रॅज्युएशनमध्‍ये मिळालेल्‍या गुणांची टक्केवारी दर्शवणारे वैध गुणपत्र/पदवी प्रमाणपत्र असले पाहिजे.
उमेदवाराकडे संगणक संचालन/भाषा/आणि शाळा/कॉलेज असणे आवश्यक आहे
प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी / हायस्कूल / महाविद्यालय / संस्थेतील विषयांपैकी एक म्हणून संगणक / आयटीचा अभ्यास केलेला असावा.

वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे.

परीक्षा फी :
SC/ST/PWD रु.175/-
सामान्य आणि इतर रु. 850/-

IBPS लिपिक प्रिलिम्स परीक्षा 2022 आणि IBPS लिपिक मुख्य परीक्षा 2022 च्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षेच्या पॅटर्नबद्दल सांगायचे तर पूर्व परीक्षेत एकूण 100 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातील. इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्कशक्तीमधून प्रश्न विचारले जातील. बँक ibps.in वर प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करेल. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख वापरावी लागेल.

प्राथमिक परीक्षा 28 ऑगस्ट, 03 सप्टेंबर आणि 04 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : ibps.in

अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.