⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मी केवळ नामधारी राज्यमंत्री होतो : राज्यमंत्री शंभूराजे देसाई

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । विधान परिषदेच्या निकालानंतर आता संपूर्ण राज्यातील राजकारण बदलेले आहे. आज पुन्हा एका बंडखोर शिवसेना आमदाराचा व्हिडियो समोर आले आहेत.. त्या व्हिडीओतून मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर आता आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. शिंदे गटातील पाटण विधानसभेतील आमदार आणि राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनीही आता थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करत मी केवळ नामधारी राज्यमंत्री होतो असं सांगितले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले शंभूराजे देसाई यांच्याकडे पाच खात्यांचा कार्यभार होता. पाच खात्यांच्या कारभाराविषयी सांगताना त्यांनी आपल्याला कोणते अधिकार होते.असा प्रश्न विचारला. अडीच वर्षात राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार मिळाले नाहीतच पण राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचं वाटप झाला. .शंभूराजे देसाई यांच्या पाच खात्यांचा कार्यभार असला तरी आपल्याला कोणते आणि काय अधिकार होते हे सागंताना त्यांनी ठाकरे सरकारने आपल्याला किती राज्यमंत्री म्हणून किती अधिकार दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यमंत्री म्हणून काम करताना आपण फक्त आमदार, पदाधिकाऱ्यांची आणि शिफारस केलेली काम करून देणं एवढचं काम राज्यमंत्री म्हणून करता आल्याचेही त्यांनी सांगितले.आपण फक्त नामधारी राज्यमंत्री होतो हे सांगताना त्यांनी विधानसभेचं कामकाज हाताळणं एवढच काम करत असताना त्या काळात राज्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांचे वाटपपण झाले नाही अशी जाहीर टीकाही त्यांनी केली.