जळगाव जिल्हाजळगाव शहरमहाराष्ट्रराजकारण

रावेर विधानसभा निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी – मनीष जैन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । रावेर विधानसभा निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिल्यास नक्की पूर्ण ताकदनिशी रिंगणात उतरणार असा दावा मनीश जैन यांनी केला आहे. नुकसानीच्या पाहणीसाठी ते रावेर तालुक्यात आले होते. (manish jain ajit pawar)

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाची विशेषता म्हणजे ३० वर्षांमध्ये येथून सातत्याने प्रत्येक पंचवार्षिकला आमदार बदलतला आहे. अश्यातच विधानसभा निवडणूक वर्षभरावर आली असल्याने कित्येकांनी आता पासुनच मोर्चाबांधणीला सुरुवात केली आहे यात आता मनीश जैन यांची यात भर पडल्याने यंदाची निवडणुक चांगलीच रंगणार आहे. (manish jain raver)

तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने मंत्री अनिल पाटील रावेर दौर्‍यावर आले होते. त्यांच्या सोबत माजी आमदार मनिष जैन देखील होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना माजी आमदार मनिष जैन म्हणाले की, रावेर विधानसभा निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला सुटणार असल्याचे बोलले जात आहे.(anil bhaidas patil raver manish jain )

रावेर विधानसभा निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिल्यास नक्की पूर्ण ताकदनिशी रिंगणात उतरणार असल्याचे माजी आमदार जैन यांनी येथे सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी निमित्त ते मंत्री अनिल पाटील यांच्या सोबत रावेर तालुक्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी याबाबतची इच्छा व्यक्त केली.

Related Articles

Back to top button