⁠ 
रविवार, मे 19, 2024

हत्या प्रकरण : दोघा संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । शहरातील एसएमआयटी महाविद्यालयानजीक निवृत्ती नगर परिसरात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघा संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, दोघांना जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मनिष नरेंद्र पाटील (रा. अहमदाबादवाडा आव्हाणे ता. जि. जळगाव आणि भुषण रघुनाथ सपकाळे (रा. डॉ. आंबेडकर पुतळयामागे खेडी खुर्द ता. जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयीतांची नावे आहेत. भावेश उत्तम पाटील या निवृत्ती नगरात राहणा-या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी तपासात निष्पन्न झालेल्या दोघा संशयितांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मागावर होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिष नरेंद्र पाटील व भुषण रघुनाथ सपकाळे या दोघांना पुणे शहरातील तळेगाव रस्त्यावरुन अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सफौ. रवी नरवाडे, पोहेकॉ संजय नारायण हिवरकर, पोहेकॉ राजेश बाबाराव मेंढे, पोना संतोष रामस्वामी मायकल, मुरलीधर सखाराम बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. दोघांना जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.