उतरूड येथे झोपडीला आग, अन्नधान्यासह सोन्याचे दागिने, कोंबड्या, पारडू खाक

फेब्रुवारी 17, 2022 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील उतरूड शिवारातील दुलसिंग सुक्राम भिल यांच्या शेतातील टेकडीवर बांधलेल्या झोपडीला, १५ रोजी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. झोपडीला लागलेल्या आगीमुळे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.

Hut fire jpg webp

झोपडीला लागलेल्या आगीमुळे संसारोपयोगी साहित्य जळाल्याने ५२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. आगीमुळे झोपडीतील ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ असे धान्य, व सोन्याचे दागिनेही जळाले. आगीत कोंबड्या व एक पारडू ठार झाले. आगीत दुलसिंग भिल यांच्या पत्नी बालंबाल बचावल्या. भिल यांनी वेळीच धाव घेत त्यांना वाचवले.

Advertisements

याबाबत माहिती मिळताच उतरूड, हिरापूर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनास्थळी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील यांनी भेट दिली. ५२ हजार रुपये नुकसानीचा पंचनामा केला. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्याचे काम सुरू होते. भरपाईची देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Advertisements

हे देखील वाचा:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now