Bhusawal : देवदर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक, पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा मृत्यू

मे 5, 2023 2:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२३ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असता दिसत आहे. याचदरम्यान, आता पौर्णिमा निमित्त हरताळा येथे दर्शनसाठी जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघात पती ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली आहे. ललित प्रभाकर नेमाडे ( वय 48 राहणार भुसावळ) असं मृताचे नाव आहे.

varangaon accident jpg webp

भुसावळ येथील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक ललित प्रभाकर नेमाडे हे आपल्या सौभाग्यवतीसह आज पौर्णिमा असल्याने हरताळा येथील देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान वरणगाव बायपास वरून जाणाऱ्या महामार्गावर त्यांच्या दुचाकीला वाहनाने जोरदार धडक दिली. यात ललित प्रभाकर नेमाडे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सौभाग्यवती या गंभीर जखमी झाल्या आहेत.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. यासोबत भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे हे आपल्या सहकाऱ्यांसह अपघात स्थळी दाखल झाले आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या संदर्भात वरणगाव पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now