आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत छत्रपती शिवाजी ग्रुपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२४ । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक तरुणांनी व छत्रपती ग्रुपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
यांनी केला प्रवेश..
गौरव गायकवाड, सनी कोळी, कुणाल अडकमोल, पवन सोनवणे, जितेंद्र सोनवणे, बापू गायकवाड, रोहित नाईक, बॉबी बाविस्कर, प्रमोद जोशी, कपिल तायडे, परेश तायडे, विशाल सोनवणे, समाधान सोनवणे, गणेश सोनवणे, संजय सहानी, लखन हिराणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला,
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, प्रदेश चिटणीस रेखाताई वर्मा, मा सभापती राजेंद्र घुगे पाटील, विक्रांत तरसोडिया, राजेंद्र सोनवणे, मनोज भांडारकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश पाटील, अक्षय जेजुरकर, निलेश तायडे, व अशोक राठी, अमित काळे आदी उपस्थित होते.