⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024
Home | नोकरी संधी | 10वी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी…! त्वरित करा अर्ज

10वी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी…! त्वरित करा अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक मोठी संधी आहे. कारण हेडक्वार्टर सदर्न कमांड पुणे यांनी कनिष्ठ हिंदी अनुवादकासह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ambala.cantt.gov.in वर १५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण ९७ रिक्त पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवार या पदांसाठी विहित अंतिम तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

रिक्त पदांची संख्या :

१. उपविभागीय अधिकारी (II) – ८९ पदे
२. कनिष्ठ हिंदी अनुवादक – ७ पदे
३. हिंदी टायपिस्ट – 1 पद

शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. तर उपविभागीय अधिकारी आणि हिंदी टंकलेखक या पदांसाठी उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2022 पासून मोजले जाईल. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटद्वारे दिले जाईल.

इतका मिळणार पगार

उपविभागीय अधिकारी ग्रेड II  – 5,200/- – 20,200/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ हिंदी अनुवादक – 34,800/- रुपये प्रतिमहिना

हिंदी टंकलेखक – 5,200/- – 20,200/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याचा पत्ता :  प्रधान संचालक, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, ECHS पॉलीक्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे (महाराष्ट्र)-411040

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : ambala.cantt.gov.in 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.