⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | हवामान | मान्सून केरळला‎ पोहोचण्यापूर्वीच जळगावातील वातावरण बदललं ; आजचं कसं असेल हवामान?

मान्सून केरळला‎ पोहोचण्यापूर्वीच जळगावातील वातावरण बदललं ; आजचं कसं असेल हवामान?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२३ । गेल्या काही दिवस तापमानाचा उच्चांक‎ अनुभवल्यानंतर आता पावसाच्या स्वागताची‎ तयारी सुरू झाली आहे. मान्सून अद्यापही केरळात दाखल झाला नसला तरी राज्यातील काही भागातील वातावरण बदलेले पाहायला मिळतेय. उद्या म्हणजेच 5 जून रोजीच्या आसपास मान्सून केरळात धडकण्याची शक्यता आहे.

त्यापूर्वी जळगाव जिल्ह्यात शनिवारी‎ उन्ह-सावलीचा खेळ पाहायला मिळाला.‎ आज रविवारी देखील सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. आज रविवारपासून तीन दिवस जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’‎ जारी करण्यात आला आहे.

तुरळक तर काही‎ ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.‎ मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर राज्यभरात सक्रिय‎ होईल असे अंदाज वर्तवले जात आहेत.

हवामान‎ अभ्यासक पंजाबराव डक यांच्या माध्यमातून‎ देखील खान्देशातील तीनही जिल्ह्यात 3 ते 8 जून‎ दरम्यान पावसाची शक्यता वतर्वण्यात आली‎ आहे. शनिवारी दिवसभर उन्ह-सावलीचा खेळ‎ सुरू होता. शनिवारी 41.9 अंश सेल्सिअस‎ कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.‎

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.