जळगाव जिल्हा

जळगाव शहरात गाडी चालवताना “या” गोष्टी नक्की करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ६ सप्टेंबर २०२१ |  जळगाव शहरात आठवडाभरापासून पावसाने जोर धरला आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे शहरातील अमृतमय रस्ते आता चिखलमय झाले आहेत. चिखलमय रस्त्यांमुळे जळगाव शहरात गाडी चालवणे अतिशय कठीण झाले आहे. यामुळे जळगावकरांनी गाडी चालवताना दोन गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये पहिले म्हणजे डोक्याला हेल्मेट करणे आणि दुसरे म्हणजे गाडी सावकाश चालवणे. अन्यथा या चिखलमय रस्त्यावरून जळगावकरांचा अपघात होऊ शकतो.

 

जळगाव शहरात कित्येक वेळा सत्तापालट होऊनही जळगाव शहराचा विकास काही व्हायला अजुन तयार नाहीये. राजकीय दूरदृष्टी अभाव असल्यामुळे जळगाव शहराचे रस्ते अजूनही खड्डेमय आहेत. जळगावकरांच्या प्रति जळगाव शहराच्या एकही लोकप्रतिनिधी हा काहीच वाटत नाही म्हणून जळगाव शहराची अशी दयनीय अवस्था झाली आहे अशी प्रतिक्रिया लोक देत आहेत. मात्र असं असलं तरीदेखील आता नागरिकांनी सुरज जीव वाचवायला हवा त्यासाठी या दोन गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे.

 

हेल्मेट घलणे

जळगाव शहरातल्या या खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचा अपघात होणे ही काही आता नवीन बाब उरलेली नाही. जळगाव शहरात समजा मायाला गाडी चालवायची असेल तर त्या आधी त्या नागरिकांनी हेल्मेट घलणे अतिशय गरजेचे आहे. यामुळे डोक्याला लागणारा मार थांबवता येऊ शकतो. याच बरोबर शक्य असल्यास नागरिकांनी फुल पॅन्ट व फुल शर्ट घालायला प्राधान्य दिले पाहिजे यामुळे पडल्यावर खरचाटण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो

गाडी हळू चालवणे

जळगाव शहराच्या रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे या खड्ड्यांमध्ये समजा कोणी जोरात गाडी चालवायचा किंबहुना वेगाने गाडी चालवायचा प्रयत्न केला तर गाडी घसरून त्या नागरिकाला इजा होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जळगाव शहरात गाडी चालवताना ती गाडी हळू चालवली गेली पाहिजे याकडे नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे. कित्येक वेळा एखाद्या ठिकाणी जायला उशीर होतो म्हणून नागरिक गाडी वेगाने चालवतात मात्र  गाडी वेगाने न चालवता नागरिकांनी जरा लवकर घरातून बाहेर निघायला हवं.

 

 

 

.

 

 

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button