जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । पारोळा तालुक्यातील जोगलखेडा येथील शेतकऱ्याचे सारख्या नावांमुळे चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात वर्ग झालेले सहा हजार रुपये परत मिळाले. त्यामुळे प्रामाणिकपणे पैसे परत करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक होत आहे.
रोजगार हमी योजनेतून ई-मस्टर प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या शेतातील कामे मजुरांद्वारे केली जातात. त्या मजुरीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतात. जोगलखेडा येथील शेतकरी किशोर पाटील यांच्या नावाचे पैसे, अमळनेर येथील किशोर पाटील नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात चुकून जमा झाले होते. अमळनेर येथील किशोर पाटील यांनी ते पैसे प्रामाणिकपणे परत केले.