मराठा सेवा संघाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी हिरामण चव्हाण तर सचिवपदी चंद्रकांत देसले
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । मराठा सेवासंघाच्या जळगाव जिल्हा महानगर अध्यक्षपदी हिरामण चव्हाण, सचिवपदी चंद्रकांत देसले व उपाध्यक्षपदी यु.जी पाटील यांची निवड करण्यात आली.
मराठा सेवा संघाची बैठक केंद्रीय निवड समितीचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य रामकिसन पवार यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा रेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जळगाव जिल्हा महानगर अध्यक्षपदी हिरामण हरीभाऊ चव्हाण, सचिवपदी चंद्रकांत उत्तमराव देसले, उपाध्यक्षपदी यु.जी. पाटील, जळगाव जिल्हा पुर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी अनिल पाटील यांची निवड करण्यात आली. नियुक्ती पत्रावर निवड समितीचे अध्यक्ष तथा औरंगाबाद विभागीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामकिसन पवार, नाशिक विभागिय अध्यक्ष दिपक भदाणे व जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्या सह्या आहेत.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतांना डॉ. पवार म्हणाले की, मराठा सेवा संघात कोणताही जातीभेद केला जात नाही. सर्वधर्म समभाव मानून कर्मकांड, अंधश्रध्दा व ढोंगीपणाला येथे थारा दिला जात नाही. सत्यावर आधारित ज्ञान विज्ञान यावर सर्व घटकांची सेवा सुरु आहे, असेही ते म्हणाले. नाशिक विभागीय अध्यक्ष तथा निवड समितीचे सदस्य दिपक भदाणे यांनी नुतन कार्यकारिणीसाठी शेवटच्या घटकापर्यंत समाजसेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी विभागिय अध्यक्ष सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, प्रा. जगदिश पाटील, जिल्हाध्यक्ष राम पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस दिपक पवार, विजय पाटील (औरंगाबाद), दिनेश कदम, डॉ.अनिल पाटील, गुणवंतराव शिजोळे (मुक्ताईनगर), ग.स.संचालिका कल्पना पाटील, दिलीप पाटील(रावेर), प्रा.जगदिश पाटील(फैजपुर), शैलेश पाटील (भुसावळ), राम पवार, सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, मधुकर पाटील, सी.ए. पवार यांसह जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, यावल, चोपडा व जळगांव तालुक्यातील सदस्य उपस्थित होते.