जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयात आज हिंदी दिवस साजरा करण्यात आला. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. प्रत्येक वर्ष 14 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात येतो.

सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच. ए. महाजन सर अध्यक्ष व प्रमुख वक्ता म्हणून लाभले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये हिंदी भाषा विषयी आपले विचार व्यक्त केले. आजच्या भूमंडलीकरणाच्या युगामध्ये हिंदी भाषा ही निरंतर अग्रेसर होत आहेआहे. केवळ भारतापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण जगामध्ये आज या भाषाने तिसरा क्रमांक मिळवलेला तसेच हिंदी भाषा आज इंटरनेट,मीडिया, टेलिव्हिजन, व्हाट्सअप, फेसबुक, ई-मेल इत्यादी द्वारे संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचण्याचे काम हिंदी भाषाने केले आहे.हिंदी भाषा ही इंटरनॅशनल इंग्रजी भाषा सोबतच आपले अस्तित्व टिकून आहे.असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सदर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.पी.पाटील हे आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. इस्माईल शेख यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार डॉ. कृष्णा गायकवाड यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.