अरे बापरे : आता पाणीपुरीचे भाव देखील वाढले
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरात संपूर्ण देशाप्रमाणे हळूहळू महागाईचा चटका जाणव लागला आहे. इतर वेळी दहा रुपयात कोणतीही गोष्ट नागरिकांना खायला मिळत होती. मात्र ह्याच सगळ्या गोष्टी आता हळूहळू महागायला सुरुवात झाली आहे. यातच सगळ्यांच्या आवडीची पाणीपुरी देखील महागली आहे.
जळगाव शहरातील नागरिकांना आता पाणीपुरी खाण्यासाठी तब्बल वीस रुपये मोजावे लागत आहेत. पाणीपुरी मध्ये एका प्लेटमध्ये नागरिकांना पाच ते सहा पाणी पुऱ्या खायला मिळतात. मात्र या पाणीपुरीचे दरही आता वाढले आहेत. आता पाणीपुरीचे दर इतके वाढले आहेत की प्रत्येक पाणीपुरी मागे नागरिकांना तब्बल तीन रुपये मोजावे लागत आहेत. अशातच आता महागाईचा चटका हा पाणीपुरीलाही लागला असून पाणीपुरीचे अजून तिखट लागू लागली आहे.
पाणीपुरी मध्ये काय काय लागतं तर पुरी लागते, चांगलं पाणी लागतं, मसाले लागतात, चिंच लागते, बटाटा आणि कांदा लागतो मात्र या सगळ्याच गोष्टी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर महाग झाल्याने आपोआपच पाणीपुरीचे दरही जळगाव शहरांमध्ये वाढले आहेत.
जळगाव शहरामध्ये गेल्या वीस वर्षापासून माझं पाणीपुरीचे दुकान आहे. गेला वीस वर्षात पाणीपुरीचे दर हळूहळू वाढले हे आम्ही पाहिले. मात्र महागाईचा चटका इतका वाढला आहे की, गेल्या दोन वर्षात पाणीपुरीचे दर दुप्पट झाले आहेत. 2021 पर्यंत आम्ही दहा रुपये प्लेट पाणीपुरी विकत होतो. मात्र आता तीच आम्हाला वीस रुपये प्लेट विकावी लागत आहे. पाणीपुरी साठी लागणारे मसाले, लागणार चांगलं पाणी, लागणारा बटाटा. कांदे इतकच काय तर पाणीपुरीच्या पुरीचे दरही वाढल्याने आम्हाला नाईलाजाने आमचे दर वाढवावे लागत आहेत.
अमन मिश्रा, पाणीपुरी विक्रेते