जळगाव लाईव्ह न्युज | १८ मे २०२२ | मंदाबाई कोळपे या नित्यनियमाप्रमाणे विहीरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मंदाबाई त्यांच्यावर अचानक जंगलातून एका बिबट्याने हल्ला केला. मात्र आजूबाजूच्या कुत्र्यांनी बिबट्या वर हल्ला करत मंदाबाईचा यांचा जीव वाचवला. यावेळी कुत्र्यांमुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये एका महिलेचा जीव वाचला.
अधिक माहिती अशी की , मंदाबाई कोपळे या आपल्या सुनबाई कृष्णाबाई कोपळे यांच्यासोबत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या शेतातील मेंढपाळांचा वन चराईसाठी जंगलात सोडले होते. तेव्हा केळीच्या बागेतून आलेल्या बिबट्याने मंदाबाई ढोकळे यांच्यावर झडप घालून तोंडात आलेल्या त्यांच्या पदराची ओढाताण करायचे सुरुवात केली. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी आजूबाजूच्या कुत्र्यांनी आपल्या मालकिणीच्या दिशेने धाव घेतली आणि थेट बिबट्या वर हल्ला केला. यामुळे लगेचच बिबट्याने तिथून धूम ठोकली
लगेचच मंदाबाई यांना जवळच्या शासकीय रुणालयात नेण्यात आले. पुढे हा प्राणी कोल्हा होता असा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला. मात्र तो बबट्याचं होता यावर कोपळे कुटुंबीय ठाम आहेत.