जळगावकरांनो लक्ष द्या! नववर्षाच्या मुहुर्तावर दुचाकीधारकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक, अन्यथा…
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२४ । मागील काही काळात जळगाव शहरासह जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकांना अपघातामुळे आपले प्राण गमवावे लागत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
तो म्हणजे जळगाव शहरात नववर्षात १ जानेवारीपासून महामार्गावर दुचाकी चालकासह पाठीमागे बसलेल्या सहकाऱ्यालाही हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी या संदर्भातील आदेश काढले.
नियमित येताना व जाताना अथवा कोणत्याही अन्य कामासाठी वाहन वापरत असताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायदा १९८८च्या तरतुदीनुसार दंड आकारला जाणार आहे अशी माहिती कळवण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 2024 मध्ये 561 अपघात झालेले आहेत. या अपघातांमध्ये 441 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये बहुतांशी जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.