जळगावकरांनो काळजी घ्या! नव्या बाधितांची संख्या तीनशेच्या जवळ

फेब्रुवारी 18, 2022 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरवू लागला आहे. गेल्या काही दिवसापासून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज पुन्हा कोरोना रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात २८५ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नव्हती मात्र आज एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

corona (2)

जळगाव जिल्ह्यात(jalgaon district) गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात महानगरांमध्ये तिसरी लाट डिसेंबर अखेर सुरू झाली असून जळगाव जिल्ह्यात या तिसऱ्या लाटेची तीव्रता वाढायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील नव्या रुग्णसंख्येचा आलेख चढताच आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ८९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर १९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५८० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ३२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

आज असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-८१, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-१०४, अमळनेर-५, चोपडा-२२, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-०, पारोळा-५, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१२, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २८५ रूग्ण आढळून आले आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now