चाळीसगावच्या मैतर कॉलनीत मध्यरात्री जोरदार दगडफेक; वाहनांसह घरांचे मोठे नुकसान

मे 10, 2026 6:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव शहरातील मैतर कॉलनी परिसरात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून करण्यात आलेल्या भीषण दगडफेकीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत नागरिकांच्या घरांचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

chs

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात जमावाने अचानक मैतर कॉलनी परिसरात प्रवेश केला आणि दगडफेक सुरू केली. या जमावाने केवळ घरांनाच नव्हे, तर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांनाही लक्ष्य केले. विशेष म्हणजे, या दगडफेकीत एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला असून, कार्यालयाचे नुकसान झाले आहे.

या भ्याड हल्ल्याची दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही अज्ञात तरुण दगडफेक करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आता हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या संपूर्ण मैतर कॉलनी परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. दगडफेकीनंतर परिसरात भीतीचे वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणात असून ‘तणावपूर्ण शांतता’ आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now