जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारणसामाजिक

जळगावात जिल्ह्यात अतिवृष्टी : ७६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । विजाच्या कडकडाटासह दमदार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. या पावसाने ७६६ हेक्टरवरील केळी, कापूस, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात २२ गावे बाधीत असून १ हजार ३३६ शेतकर्‍यांचे नूकसान झाले आहे.

आठ महसूल मंडळात अतिवृष्टी
जिल्ह्यात एकूण सरासरी २५ मिलीमिटर पाउस झाला. रावेरला ६० मिलीमिटर, जळगावला ५१.८ मिलीमिटर, भुसावळला ३६ मिलीमिटर, चोपडा ४९, मुक्ताईनगर तालुक्यात ४०.३ पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यातील भोकर, धानोरा, अडावद, ऐनपूर, खिर्डी, पिंप्राळा, रावेर आणि सावदा या आठ महसूल मंडळामध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सरासरी ९५ टक्के पाऊस
जळगाव जिल्ह्यात जून महिन्यापासून ते आता पर्यंत सरासरी ९५ टक्के पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात जळगाव ९१.५० टक्के, भुसावळ ८८.५०, यावल १०३, रावेर १०५, मुक्ताईनगर १०७, अमळनेर ९४.८०, चोपडा ९५.१०, एरंडोल ९४, पारोळा ७९.६०, चाळीसगाव १०६.९०, जामनेर ८८.९०, पाचोरा ८७.३०, भडगाव १०१.९०, धरणगाव ८०.७०, बोदवड ८५.३० असा पाऊस झाला आहे.

चार वर्षांत काहीही बदल नाही
२०१९ पासून ते आतापर्यंत सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार वर्षापासून अशी स्थिती पाहायला मिळत आहे. पर्यावरणामध्ये होणारे बदल यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले जात आहे.

Related Articles

Back to top button